ताज्या बातम्या
lokshahi marathi : 'LOKशाही' मराठीला दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार, मान्यवरांच्या हस्ते 'LOKशाही मराठी'चा सन्मान....
प्रभावी पत्रकारिता, विश्वासार्ह बातमीदारी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करणाऱ्या ‘लोकशाही मराठी’ या न्यूज चॅनेलला दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म फाउंडेशनतर्फे मानाचा दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार देण्यात आला आहे
मराठी डिजिटल मीडियाच्या जगतात अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. प्रभावी पत्रकारिता, विश्वासार्ह बातमीदारी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करणाऱ्या ‘लोकशाही मराठी’ या न्यूज चॅनेलला दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म फाउंडेशनतर्फे मानाचा दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार देण्यात आला आहे
लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू यांच्या नेतृत्वात चॅनेलने सातत्याने सामाजिक भान आणि निष्पक्ष बातमी मांडणीची परंपरा जोपासली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांनाही विशेष सन्मान देण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार हा मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील गुणवंतांना देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान आहे. या पुरस्काराने लोकशाही मराठीने अल्पावधीत मिळवलेली लोकप्रियता आणि विश्वसनीयता अधोरेखित झाली आहे.
