Lokshahi Marathi: लोकशाही मराठी वृत्तवाहिनी पुन्हा आपल्या सेवेत

Lokshahi Marathi: लोकशाही मराठी वृत्तवाहिनी पुन्हा आपल्या सेवेत

दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली. लोकशाही मराठीच्या सॅटेलाईट प्रेक्षेपणास सुरुवात झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

लोकशाही मराठी वृत्तवाहिनी 9 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 6:00 वाजता बंद झाले होते आणि 19 दिवसांनंतर आज म्हणजेच 27 जानेवारी 2024 ला लोकशाही मराठीचं प्रक्षेपण पुन्हा सुरु झाले आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं लोकशाही मराठीला कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितलं होतं. माहिती प्रसारण मंत्रालयाकडे या कागदपत्रांची पूर्तता केली. लोकशाहीनं सादर केलेल्या कागदपत्रांमुळे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे समाधान झाले. त्यानंतर कोर्टाने लोकशाहीच्या प्रसारणाला परवानगी दिली.

तब्बल 19 दिवसांनंतर लोकशाही मराठी सॅटेलाईट प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुम्हाला दिसणार आहे. लोकहिताच्या बातम्या घेऊन शानदार दमदार पुनरागमन होणार आहे. 30 दिवस लोकशाही मराठी वृत्तवाहिनी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतू कोर्टात लगेच धाव घेतल्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 दिवसांनंतर लोकशाही मराठीचं प्रक्षेपण पुन्हा सुरु झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com