कळवा रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू; प्रशासनानं सांगितलं 'हे' कारण

कळवा रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू; प्रशासनानं सांगितलं 'हे' कारण

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावर शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.

कळवा रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू; प्रशासनानं सांगितलं 'हे' कारण
Kalwa Hospital : आत येण्याचे दरवाजे उघडे, पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा; आव्हाडांचे टीकास्त्र

रुग्णालयातील १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा वाढीव भार कळवा रुग्णालयावर पडत आहे. परंतु, येथे अपुरी डॉक्टरांची संख्या आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याने रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अविनाश जाधव आणि आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com