Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

मुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जेवणासाठी 3 महिन्यात तब्बल 2.38 कोटी खर्च

माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड

विकास कोकरे | बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी अवघ्या १२३ दिवसात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत असल्याची माहिती आरटीआयमधून प्राप्त झाली आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंबंधी अर्ज केला होता.

Eknath Shinde
...तर मी नियुक्त केलेले अध्यक्ष योग्य कसे? नरहरी झिरवळ

नुकतेच शिंदे सरकारने ७ महिन्यात जाहिरातींसाठी ४२ कोटी रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी होणाऱ्या वारेमाप खर्चाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सोबत सह्याद्री अतिथीगृहात चहा, कॉफी, नाष्ट्यासाठी ८ दिवसात ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री बैठक व त्यांचे भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा, कॉफी, थंडपेयेसाठी ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च केल्याची माहिती या पत्रात आढळून येत आहे. त्यामुळे वारेमाप होणाऱ्या या उधळपट्टीवर अंकुश लावण्यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com