PM Modi
PM ModiTeam Lokshahi

पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी नवी मुंबईतून 250 हून अधिक बसेस रवाना

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरंगे | नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. बीकेसी येथे त्यांची सभाही होणार आहे. या सभेत गर्दी व्हावी आणि पंतप्रधानांचे भाषण कार्यकर्त्यांना ऐकता यावे यासाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात परिवहन मंडळ तसेच खाजगी बसेस जवळपास 225 हून अधिक बसेस, तसेच खाजगी गाडया भरून कार्यकर्ते बीकेसीकडे रवाना झाले आहेत.

PM Modi
महाविकास आघाडीने उमेदवार केले घोषित, नाशिकमधून शुभांगी पाटीलच; पाहा कुठे कोण?

बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली 75 हून अधिक बसेस बीकेसीच्या दिशेने निघाल्या आहेत. भाजप नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक बसेस भरून कार्यकर्ते बीकेसीला निघाले आहेत. यासाठी ऐरोली टोल नाका तसेच वाशी टोल नाका परिसर बसेसने गजबजला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर येत असून दोन मेट्रो मार्गांचेही उद्घाटन होणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप तयारीच्या कामात व्यस्त आहे. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने तो यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाने आपली पूर्ण ताकद लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या बीकेसीमध्ये आयोजित सभेत लाखो नागरिक सामील होतील याची जोरदार तयारी करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई परिसरातील भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी 225 हून अधिक एनएमएमसी आणि खाजगी बसेस बुक केल्या होत्या. या बसेसच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी निघाले आहेत. प्रत्येक वॉर्ड तसेच नागरिकांच्या सोयीने या बसेस पाठवल्या गेल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com