वसंत मोरेंच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी देत मागितली 30 लाखांची खंडणी

वसंत मोरेंच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी देत मागितली 30 लाखांची खंडणी

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे.

चंद्रशेखर भांगे | पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत मोरेंच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी देत मागितली 30 लाखांची खंडणी
तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची; मनसेने उडवली ठाकरे गटाची खिल्ली

वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच, खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या घालण्याचीही धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरु केला असता औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीचे मॅरेज सर्टिफिकेट बनवल्याचे समोर आले आहे. या अनुषगांने पुढील तपास सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com