राजकारण
कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; बाळासाहेब थोरात म्हणाले...
लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावर किरीट सोमय्या प्रकरणासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उमाकांत अहिरराव, धुळे
लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावर किरीट सोमय्या प्रकरणासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.कमलेश सुतार यांनी सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर भाजपतर्फे दडपशाहीचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणत. आज सर्व काही दहशतीखाली आहे हे दहशत निर्माण करण्याकरिताच कमलेश सुतार यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
तुम्ही जर आमच्या विरोधात काही बोलाल तर तुमचा देखील कमलेश सुतार करू तुमच्यावर सुद्धा केसेस दाखल करून पाहिजे तर तुम्हाला देखील अटक करू ही दहशत निर्माण करण्यासाठी हे निकोप लोकशाही नसल्याचे देखील टीका बाळासाहेब थोरात यांनी केली असून, भाजपतर्फे पत्रकारांची देखील मुस्कटदाबी केली जात असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.