Aaditya Thackeray : EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर!

Aaditya Thackeray : EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर!

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इलेक्शन कमिशन खरोखर 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' आहे का? पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर! असे म्हटले आहे.

Aaditya Thackeray : EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर!
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजितदादांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com