राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजितदादांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा अपेक्षित निर्णय आहे. कारण मागील अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली. समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे.
बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो. ते महत्वचे आहे.पक्षाचे संविधान आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात या सगळ्या गोष्टीचा निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल. असे फडणवीस म्हणाले.