Aaditya Thackeray on Shinde Group : ओरिजनल गद्दारांच्या बॅचला मंत्रिपदं मिळणार नाहीत : आदित्य ठाकरे

पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बीएमसीच्या 263 कोटी रुपयांच्या रस्त्यावरील फर्निचर खरेदीची चौकशी करण्याची घोषणा केली. या करारातील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी 1 जुलै रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे आपण महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासमोर प्रश्न मांडले. परंतु, अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.

यावर आदित्य ठाकरे यांनी आता ट्विट केलं. मुंबई पालिकेतील फर्निचर घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांद्वारे करा, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिली. सोबतच आदित्य ठाकरे यांनी 'ओरिजनल गद्दारांच्या बॅचला मंत्रिपदं मिळणार नाहीत', असे म्हणून शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com