रवी राणा-बच्चू कडू यांना सत्तारांचा सल्ला; 
दोघांचाही छोटा पक्ष...

रवी राणा-बच्चू कडू यांना सत्तारांचा सल्ला; दोघांचाही छोटा पक्ष...

राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे

विकास माने | परभणी : राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मत मांडले आहे. रवी राणा व बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला सत्तारांनी दिला आहे.

रवी राणा-बच्चू कडू यांना सत्तारांचा सल्ला; 
दोघांचाही छोटा पक्ष...
मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन; खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

अब्दुल सत्तार सध्या परभणी दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी राणा-कडू वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दोघांचाही छोटा पक्ष आहे. काय निर्णय घ्यावं दोघांनी ठरवावे. दोघांनी मिळून संकटाच्या काळात महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. शेकऱ्यांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला त्यांनी राणा-कडू यांना दिला आहे.

तसेच, राज्यभरात शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. जुलै, ऑगस्ट अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले आहे. परत परतीच्या पावसात देखील पिकांचे नुकसान झाले. परंतु. राज्यातला एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे, अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत सांगितले आहे.

रवी राणा-बच्चू कडू यांना सत्तारांचा सल्ला; 
दोघांचाही छोटा पक्ष...
खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; आदित्य ठाकरेंचा प्रहार

काय आहे रवी राणा व बच्चू कडू यांचा वाद?

बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक गंभीर आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. यावर बच्चू कडू यांनी थेट पोलीस स्टेशमनध्येच तक्रार दाखल केली होती. अखेर या दोघांमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली असून दिवाळीनंतर एकत्र बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु, कडू आणि राणा यांच्यामधील वाद थांबायचे नाव घेत नसून आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणांबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर, आपण मोठा धमाका करु, असा इशाराच दिला आहे. यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा रवी राणांनी बच्चू कडूंना डिवचले. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे. असं ट्वीट राणा यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com