बेताल वक्तव्य करणाऱ्यांची मी जीभ हासडून टाकेन; अभिजित बिचुकले भडकले

बेताल वक्तव्य करणाऱ्यांची मी जीभ हासडून टाकेन; अभिजित बिचुकले भडकले

संभाजी भिडेंच्या विधानावरुन राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी संभाजी भिडेंवर टीकेची झोड उठवली असून अटकेची मागणी केली आहे. अशातच, आता अभिजीत बिचुकले यांनी प्रतिकिया दिली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा वक्तव्याने प्रकाश झोतात आले आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. त्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी संभाजी भिडेंवर टीकेची झोड उठवली असून अटकेची मागणी केली आहे. अशातच, आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिकिया दिली आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांची मी जीभ हासडून टाकेन; अभिजित बिचुकले भडकले
राऊत आणि उद्धव ठाकरेंवर आता राजकीय दुकान बंद करण्याची वेळ; कुणी केली टीका?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडून टाकेन. गाठ माझ्याशी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली आहे. गेली दीड वर्ष अनेक नेते मंडळी महापुरुषांबद्दल अपशब्द काढत आहेत. हे अतिशय लांछनास्पद आहे. जेम्स लेन यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल विकृत लिखाण केलं होतं. त्यावेळी हे आता बोलणारे कुठे जाऊन झोपले होते? असा सवालही बिचुकलेंनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. याची ऑडीओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com