समिती जो निर्णय घेईल तो मान्य; शरद पवारांचे मोठे विधान

समिती जो निर्णय घेईल तो मान्य; शरद पवारांचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्ते वाय.बी.सेंटरवर आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनकर्त्यांशी शरद पवारांनी चर्चा केली आहे. यादरम्यान, 6 मे ऐवजी 5 मे रोजीच अध्यक्ष पद निवड समितीची बैठक होईल, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे. समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

समिती जो निर्णय घेईल तो मान्य; शरद पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चां, जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले...

मी वरीष्ठांना व माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, असे शरद पवारांनी म्हंटले आहे. पण, ६ मे ऐवजी बैठक ५ मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

१ मे १९६० रोजी मी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं १ मे शी वेगळं नातं आहे. मी युवक कॉंग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक व युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर, राष्ट्रवादीमध्ये राजीनामासत्रही सुरु झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com