आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, बोगस बियाणे संबधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. "दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी कन्टेजन्सी प्लान तयार करण्यात आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.
पुढील येणाऱ्या काळात पेरण्या योग्य पद्धतीने होतील.राज्यात काही भागात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. मागील काळात ज्या पेरण्या झाल्या होत्या. त्याच्यापैकी 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. असे फडणवीस म्हणाले.