shinde fadnavis aditya thackeray
shinde fadnavis aditya thackerayTeam Lokshahi

आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत निवडणुका घेण्याचं खुलं आव्हान दिले.

मुंबई : शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत निवडणुका घेण्याचं खुलं आव्हान दिले. एका कार्यक्रमानिमित्त अंधेरी येथे ते आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिकेच्या निवडणुका घ्या, तसंच विधानसभेच्या निवडणुका घ्या. पण, यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमत नाहीये, असं आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

shinde fadnavis aditya thackeray
शरद पवारांनी एवढी वर्षे राजकारण केलं, तरी त्यांचं बारामती होऊ शकलं नाही, - जितेंद्र आव्हाड

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० गद्दार आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात. पण, राज्यासाठी कधी गेले नाहीत. आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना मुंबई महानगरपालिका संदर्भात गंभीर मुद्दा मांडला. स्थायी समितीने १७०० कोटींची कामे मंजूर केली होती. मात्र ही कामे आयुक्तांनी बदलली. ही कामं आयुक्त अशी बदलू शकतात का? यावर काम सुरु आहे. खरोखर 7 हजार कोटीची कामे होऊ शकतात आणि जर होत असतील तर मग कल्याण नागपूरला रस्ते का नाही झाले? यावर आमचा अभ्यास सुरु आहे. यावर कायदेशीर बाबी पडताळणी करत आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com