आदित्य ठाकरेंचे लोकशाहीच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; माझ्या बाजूला...

आदित्य ठाकरेंचे लोकशाहीच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; माझ्या बाजूला...

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून साधला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील गुंतवणूक मागील सरकारमुळे परराज्यात गेल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून दिले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकशाहीच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

आदित्य ठाकरेंचे लोकशाहीच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; माझ्या बाजूला...
आमचं रामराज्याचं हिंदुत्व तर त्यांचे रावण राज्याचं; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

ते 2014 ते 2019 चं बोलत असतील. उद्योगावर मी बोलायला तयार आहे. माझ्यानंतर ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) येणार आहेत. माझ्या बाजूला खुर्ची लावा. माझ्या हातात कोणताच कागद नाही. त्यांच्या खात्यापासून सुरू करूया. त्यांच्या सोबत खात्याची लोकं असुद्या. मी चर्चेला तयार आहे, असे थेट आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

उद्योग काही १५ दिवसांत होत नाहीत. अडीच वर्षे ह्यांनी वाद केला. तो उद्योग यांचा खेटे घालत होता. कॅबिनेट कमिटीची एकही बैठक घेतली नाही. त्याचवेळी गुजरातने बैठक घेऊन १५ दिवसांत निर्णय दिला. आम्हाला कळाले तेव्हा आम्ही १५ दिवसांत निर्णय घेतला. पण तोपर्यंत उद्योग गेला होता. तुम्ही वसुली सुरु केली होती. अशात कोणता उद्योग येईल? त्या सरकारचे नावच वसुली सरकार होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकरावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com