गुजरातला दोन मुख्यमंत्री, एक तिकडे आणि एक इकडे बसलेत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

गुजरातला दोन मुख्यमंत्री, एक तिकडे आणि एक इकडे बसलेत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

मुंबई : आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. केंद्राकडून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. वज्रमुठ सभेच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे स्वागतपर भाषण केले. यावेळी ते बोलत होते.

गुजरातला दोन मुख्यमंत्री, एक तिकडे आणि एक इकडे बसलेत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
ही गद्दारांची सभा नाहीये, खुर्च्या रिकाम्या असायला; आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. पण, गुजरातचे काय भाग्य आहे बघा. केंद्र सरकार जे काही देतंय ते गुजरातला देतंय. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न दिल्लीत होत आहे. पण हा महाराष्ट्र आहे. हा तुम्हाला वाकवेल पण झुकणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गेल्या 8-10 महिन्यात महाराष्ट्र अंधारात गेला आहे. या अंधारातून आपल्याला महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. कोरोना काळातही आमच्या सरकारमध्ये लाखोंची गुंतवणूक आणली. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात आणि सर्व मविआच्या नेते काम करत होते. या सरकारमध्ये मुंबईचे कोणी मंत्री नाहीत. स्क्वेअर फूट विकणारे आहेत पण इंच इंच जाणणारे नाहीत. हे घटनाबाह्य सरकार जाणार म्हणजे जाणारच, असे पुर्नच्चार त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com