ही गद्दारांची सभा नाहीये, खुर्च्या रिकाम्या असायला; आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

ही गद्दारांची सभा नाहीये, खुर्च्या रिकाम्या असायला; आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. परंतु, याच सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं दृश्य समोर आलं आहे.

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. परंतु, याच सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं दृश्य समोर आलं आहे. यावरुन शिंदे गट-भाजपाने ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आज वज्रमुठ सभेतून आदित्य ठाकरेंनी उत्तर दिले आहे. ही गद्दारांची सभा नाहीये. खुर्च्या रिकाम्या असायला. आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या राहत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

ही गद्दारांची सभा नाहीये, खुर्च्या रिकाम्या असायला; आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
बाजार समितीत संदिपान भुमरे यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीला धक्का

वज्रमुठ सभेच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे स्वागतपर भाषण करत आहेत. यामध्ये लोक अजून येत आहेत म्हणून खुर्च्या रिकाम्या आहेत. ही गद्दारांची सभा नाही म्हणून खुर्ची रिकामी आहे. आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाही. आम्ही जनतेतील लोक आहे. येथे जाती, धर्माचा प्रांतांचा भेदभाव दिसत नाही. आपण सर्व संविधान रक्षक एकत्र आलेलो आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

जेव्हा मविआच्या वज्रमुठ सभेच्या तारखा ठरत होत्या. तेव्हा मी 1 मे रोजी मुंबईत सभा घेण्याची मागणी केली. आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. गेल्या 8-10 महिन्यात महाराष्ट्र अंधारात गेला आहे. या अंधारातून आपल्याला महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

कोरोना काळातही आमच्या सरकारमध्ये लाखोंची गुंतवणूक आणली. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात आणि सर्व मविआच्या नेते काम करत होते. या सरकारमध्ये मुंबईचे कोणी मंत्री नाहीत. स्क्वेअर फूट विकणारे आहेत पण इंच इंच जाणणारे नाहीत. हे घटनाबाह्य सरकार जाणार म्हणजे जाणारच, असे पुर्नच्चार त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com