भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर डोळा; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर डोळा; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई दौरादरम्यान महापालिकेचे रणशिंग फुंकले होते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ३७ हजार ५०० कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले होते. यावेळी पैसा महापालिकेत पडून आहेत. त्याचा योग्य वापर होत केला नाही, अशी टीका शिवसेनेवर केली होती. याला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर डोळा; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका
लेखी उत्तर द्या; दोन्ही गटांना निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या सूचना

कालच्या सभेतून हे स्पष्ट झाले की त्यांचा मुंबईकरांच्या पैशांवर डोळा आहे. जिथे जिथे हे नागपूर, ठाण्यामध्ये महापालिकेत सत्ता चालवत होते. तिथे कुठेही सरप्लसमध्ये फिक्स डिपॉझिट नाही. जनतेचा पैसा वापरला कुठे, कुठे गेला हे कोणालाच माहित नाही. परंतु, मागील 25 वर्ष शिवसेनेचे सरकार आल्यानंतर आपण जे डेफिसिटमध्ये होतो, ते सरप्लसमध्ये आणले. आणि जनतेसाठी पैसे वापरले. जनतेचा पैसा त्यांच्या डोळ्यामोर आहे. मात्र, यांच्या डोळ्यात तो पैसा आहे. आणि त्याच्यावर हात मारायचा हे स्पष्ट आहे, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. कॉंक्रिटीकरण रस्ते बनविणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. थोडातरी त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. कारण अभ्यास न करता खाते चालवणे अथवा राज्य चालवणे हे धोकादायक आहे, असा निशाणा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर साधला आहे.

आपण बघितले तर जगात कोठेही असे शहर नाही जिथे 100 टक्के कॉंक्रिटीकरण झाले आहे. या कामांसाठी साडेसहा हजार कोटींची कामे एकत्र काढण्यासाठी तुम्ही पैसे कोठून आणणार आहेत? अर्थसंकल्पात कोठे दाखवणार आहात? व्हाईट बुकमधील आहे का बाहेरचा आहे? एफडी तोडणार आहेत का? याचे कुठेही उत्तर दिलेले नाही. तसेच, मुख्यमंत्र्यांना समजवून सांगायच असेल त्यांची कामे योग्य कशी? मला कधीही त्यांच्यासोबत बोलवावे. आपण चर्चा करु, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com