खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; आदित्य ठाकरेंचा प्रहार

खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; आदित्य ठाकरेंचा प्रहार

दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे.

मुंबई : दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. यावरुन विरोधकांनी आता शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असा जोरदार प्रहार शिवसेना (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; आदित्य ठाकरेंचा प्रहार
शिंदे सरकारला धक्का: टाटा-एअरबसचा 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एयरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही. टाटा एयरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं.

गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; आदित्य ठाकरेंचा प्रहार
मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन; खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

काय आहे प्रकल्प?

सी-२९५ विमानांचा पहिला ताफ्यातील १६ विमाने सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. अशा 40 विमानांची निर्मिती टाटा ऍडव्हान्स सिस्टीम करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com