स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांचे शिरोमणी : आदित्य ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांचे शिरोमणी : आदित्य ठाकरे

उध्दव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिली आणि अभिवादन केले.
Published on

नाशिक : उध्दव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिली आणि अभिवादन केले. यावेळी उध्दव ठाकरेंनी सावरकर यांच्या वाड्याची पाहणी देखील केली. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी अभिप्राय लिहिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील स्मारकाच्या ठिकाणी उध्दव ठाकरेंनी सहकुटुंब भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अभिप्राय लिहिला आहे. जय हिंद, स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांचे शिरोमणी असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे. तसेच, मातृभूमीसाठी आयुष्याचा अंत करणारा असा क्रांतिवीर पुन्हा होणे नाही. भगूरचं त्यांचे निवासस्थान सतत प्रेरणा देत राहील, असेही आदित्य ठाकरेंनी आपल्या अभिप्रायात म्हंटले आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली असून श्रीरामांचे दर्शन घेतले आहे. यावेळी उध्दव ठाकरे काळाराम मंदिरात आरती केली आहे. तसेच, गोदावरी तीरावरही उद्धव ठाकरे आरती करणार आहेत. उध्दव ठाकरेंसोबत राऊत आणि अरविंद सावंत हेही उपस्थित आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com