आव्हाडांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरेंचा घरचा आहेर; म्हणाले...

आव्हाडांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरेंचा घरचा आहेर; म्हणाले...

जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई : राम मांसाहारी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. रामाला आदर्श मानून मटण खातो, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

आव्हाडांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरेंचा घरचा आहेर; म्हणाले...
राम मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाड यांचे विधान

आदित्य ठाकरे म्हणाले की, असे वाद झालेच नाही पाहिजे. देवादेवतांवरुन वाद झालेच नाही पाहिजे. वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार? धर्म, जातीवरुन आपण भांडत आहोत भविष्यासंदर्भात आपण विचार करायला हवा, असा घरचा आहेर त्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरती 500 रुपयांचा टोल असल्याची माहिती मिळत आहे. यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले आहे. एमटीएचएलचं उद्घाटन दोन-अडीच महिन्यांपासून पेंडिंग आहेत. दिघा आणि उरण लाईनचं देखील उद्घाटन पेंडिग आहेत. वेदांता फॉक्सकॉन, टेस्ला याचं प्रायश्चित म्हणून एमटीएचएलचा टोल माफ करावा आणि टोल लावू नका, असं मी चॅलेंज त्यांना देत आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यात चार ते पाच बैठका झाल्या आहेत, बिल्डर त्यांना धमक्या देतात. बिल्डरच्या घशात आम्ही रेसकोर्सची जागा जाऊन देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येत सांगावं की जागा बिल्डरच्या घशात घालणार नाहीत. भाजपला आमचा प्रश्न आहे, एमओयू होणार आहे काय त्यांची भूमिका आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com