कर्नाटकातील सरकारला शुभेच्छा, पण मराठी बांधवांना त्रास...: आदित्य ठाकरे

कर्नाटकातील सरकारला शुभेच्छा, पण मराठी बांधवांना त्रास...: आदित्य ठाकरे

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.

मुंबई : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी के शिव कुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, सीमा भागातील मराठी माणसांना न्याय मिळेल, ही अपेक्षाही व्यक्त केली आहे.

 कर्नाटकातील सरकारला शुभेच्छा, पण मराठी बांधवांना त्रास...: आदित्य ठाकरे
नाना पटोलेंनी आधी आदर्श नागरीक बनावं; मुनगंटीवारांचा सणसणीत टोला

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या जी आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार जी ह्यांनी आज शपथ घेतली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! येणाऱ्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधले संबंध अधिक दृढ होतील, दोन्ही राज्यांची भरभराट होईल आणि सीमा भागातील मराठी माणसांना न्याय मिळेल, ही अपेक्षा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. तर, मराठी भाषिक बांधवांना त्रास न देता लक्ष द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, कर्नाटकातल्या ४० टक्के सरकारचा धुव्वा उडवून जनतेने ह्या नवीन सरकारला निवडून आणले आहे. महाराष्ट्रातही लवकरच त्याची पुनरावृत्ती होऊन गद्दारांना जनता सत्तेवरुन खाली खेचेल, याची खात्री आहे, असा निशाणाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com