विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. तरी न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरेही ओढले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ४० लोक अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या, तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं; बच्चू कडूंची प्रतिक्रिया

हे सरकार घटनाबाह्य आहे. अनैतिक आहे. यावर आज शिक्कामोर्तब झालं. राज्यपाल नव्हे हे भाज्यपाल आहेत. ते एका पक्षाची भूमिका चालवत होते. राज्यपाल पद हुकूमशाही चालवण्यासाठी चालवलं जातंय का? राज्यांचा अधिकार ठेवला की नाही? याचं उत्तर मिळायला हवं, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी घेतील तेव्हा हे आमदार अपात्र ठरतील. यामुळे ४० गद्दारांचे दोन-तीन महिने राहिलेत. त्यांच्यात नैतिकता असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेत निकालावर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सत्तेसाठी हापलेल्या लोकांचे उघडे-नागडे राजकारण याचे त्यांनी चिरफाड केली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झालेले आहे. माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून मी घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com