एकनाथ शिंदे घरी येऊन रडले, त्यादिवशी नेमके काय घडलं? आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितले

एकनाथ शिंदे घरी येऊन रडले, त्यादिवशी नेमके काय घडलं? आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितले

एकनाथ शिंदेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : जेलच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या विधानावरुन आदित्य ठाकरेंवर सत्ताधारांनी टीकेची झोड उठवली होती. तर, एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे लहान असल्याचा निशाणा साधला होता. यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मला लहान आहे म्हणतयात, मग मी मोठा झालो तर किती घाबरतील, असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे घरी येऊन रडले, त्यादिवशी नेमके काय घडलं? आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितले
'रश्मी ठाकरे पूर्वी बंद दाराआड राजकारण करत होत्या, आता जाहीरपणे करतील'

मी पहिल्या दिवशी बोललो होतो. आम्ही वर्षावर असताना एकनाथ शिंदेंना घरी बोलवलं होतं. तेव्हा त्यांना विचारलं की गद्दारी का करायची आहे? बंडखोरी का करायची आहे? पक्ष सोडून जावसं वाटतंय की मुख्यमंत्री व्हायचं आहे. संजय राऊत यांनीही सांगितलं. पडद्याच्या आड चाललं होतं. हुडी वैगरे घालून जायचे का? हे माहिती नव्हतं. अनेक गोष्टी कानावर आल्या होत्या म्हणून 20 मे रोजी त्यांना उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं होतं, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचं चांगलं व्हावं हीच इच्छा आहे. हदयात राम आणि हातात काम ही परिस्थिती राहिली पाहिजे. शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही, महिला अत्याचार वाढले आहेत. कोणावर अन्याय होऊ नये हेच आमचे हिंदुत्व आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

हू इज धंगेकर हे विचारणारे चंद्रकांत पाटीला यांना उत्तर मिळाले आहे आणि आता आगामी निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल व लोक उत्तर देतील. हे ठरवून केलं जातंय पक्षाकडून खडा टाकला जातोय. किती लोक बोलतायत हे बघितलं जातंय. त्यानंतर त्या पक्षाने माफीसुद्धा मागितलेली नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा आला आहे. यानुसार आता विधवा महिलांना विधवा या नावाने नाहीतर ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी हे असं करू नये. महिलेला मान-सन्मान मिळाला पाहिजे. हे असं डिस्क्रीमेशन योग्य नाही, असे म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com