Gunratna Sadavarte | Sharad Pawar
Gunratna Sadavarte | Sharad PawarTeam Lokshahi

पवारांवर टीका करताना सदावर्तेंची जीभ घसरली; म्हणाले, तोंडाला आजार...

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत. हैदाबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच आज मुंबईत लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात भाजपासह शिंदे गटाचे देखील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याच मोर्चात अॅड. गुणरत्न सदावर्ते हे देखील सहभागी झाले होते. याच मोर्चात एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना गुणरत्न सोनावणे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Gunratna Sadavarte | Sharad Pawar
लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू : अजित पवार

काय म्हणाले सदावर्ते?

हिंदू जनआक्रोश मोर्चात कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले की, याच सर्व बाबी लक्षात घेता आज येथे हिंदू समाज एकवटला आहे. शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. तरी त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत. हैदाबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही. अशी गंभीर स्वरूपाची टीका त्यांनी यावेळी केली. सोबतच त्यांनी या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com