राजकारण
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट, "आलं तर आलं तुफान”
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेत प्रतिक्रिया येत आहेत. यातच आज शरद पवारांची येवल्यात सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यातच आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हटले आहे की, तुफानाला घाबरुन काय करायचं
तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे
तुफानापासून पळून जाणाऱ्या
माणसाच्या हातून काही घडत नाही.
तुफानाला तोंड देण्याची
जी शक्ती आणि इच्छा आहे
त्यातनं तो काहीतरी करू शकतो
आणि घडवू शकतो
अशी माझी धारणा आहे– यशवंतराव चव्हाण (७ मे १९८४, अहमदनगर) असे सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आहे. सुळेंचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.