पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह पुणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यानंतर आता गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहे. 6 ऑगस्ट रोजी शहा पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यादरम्यान शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने मोदींचा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. अशातच, आता अमित शहा हेही 6 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले असून तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत.
परंतु, केंद्रीय सहकार संस्थेच्या पोर्टलचं उद्घाटन अमित शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार मला मिळणं हे माझे भाग्य आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर, शरद पवारांनी देशांतील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केला होता, असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला.