वेदांतानंतर फोनपेही महाराष्ट्रातून बाहेर पडणार; कार्यालय मुंबईहून 'या' राज्यात

वेदांतानंतर फोनपेही महाराष्ट्रातून बाहेर पडणार; कार्यालय मुंबईहून 'या' राज्यात

शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी केली टीकास्त्र सोडण्यास सुरुवात

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या कंपनीने महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. फोनपे अॅपने देखील महाराष्ट्रातून जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गुरुवारच्या वृत्तपत्रात मुंबईतील फोनपे कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात जाणार असल्याचे जाहीर सूचनेमध्ये दिले आहे.

फोनपेने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरूला हलवले आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. फोनपेने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरूला हलवले आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. यावरुन आता विरोधकांनी शिंदे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. फोनपेचे वृत्तपत्रातील कात्रण शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

रोहित पवार म्हणाले की, वेदांतानंतर फोनपेची बारी, गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे.. वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर.. काय चाललंय काय ? महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ? जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे आक्षेप नोंदवा ....

तर, जितेंद्र आव्हाडांनीही आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे. वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर.काय चाललंय काय ? महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ? जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे आक्षेप नोंदवा, असे म्हंटले होते.

दरम्यान, पावणेदोन कोटींचा मेगा-प्रोजेक्ट वेदांत-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये राबविण्याची निर्णय घोषित केला होता. यामध्ये 2 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता होती. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची राळ उठवली होती. त्यातच मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी- लिंकचे कामाच्या मुलाखतीची जाहिरात चैन्नईला दिल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com