संजय राऊतांचा नातू आला तरी सरकारमध्ये...: अब्दुल सत्तार

संजय राऊतांचा नातू आला तरी सरकारमध्ये...: अब्दुल सत्तार

संजय राऊत यांच्या विधानाचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाचार घेतला

प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : पुढची गुढी आपलीच असणार, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या विधानाचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावं. त्यावेळेस तुमचे सरकार येईल, असे अब्दुल सत्तारांनी म्हंटले आहे. नंदुरबारमध्ये नुकसानीची पाहणी सत्तारांनी केला आहे. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊतांचा नातू आला तरी सरकारमध्ये...: अब्दुल सत्तार
टायगर अभी जिंदा है! मनसेचे नवे स्फुर्तीगीत प्रदर्शित

संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत. त्यांनी आम्हाला शिकवण्याचं काम नाही आणि त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेल्या चॅलेंज स्वीकारावा आणि पुन्हा निवडून दाखवावं. त्यावेळेस तुमचे सरकार येईल. आणि संजय राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढी यांच्या सरकार येणार नाही. संजय राऊत यांचा नातू जरी आला तरी सरकारमध्ये येणार नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर केलल्या आरोपांचेही अब्दुल सत्तारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत हे कधीच खरं बोलत नाही, त्यामुळे दादा दादा भुसे यांनी दिलेल्या चॅलेंज स्वीकारायला संजय राऊत यांना मिरची का लागत आहे. संजय राऊत हे बोटावर मोजण्याइतके आमदार-खासदारांचा नेता आहे. संजय राऊत यांनी विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्ही बोलू शकतो, संजय राऊत यांनी ज्यांच्या नमक खाल्ला आहे त्यांच्या तरी जाण ठेवा, असे अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाला असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार नंदुरबार जिल्ह्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार ३६०० पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पिकानुसार पंचनामे करण्यात येत असून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई न देता पिकांच्या झालेल्या नुकसानीनुसार भरपाई देण्यात येईल विधिमंडळाच्या अधिवेशनातच भरपाई संदर्भातली घोषणा करण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com