अजित पवारांना 29 आमदारांचा पाठिंबा; यादी आली समोर

अजित पवारांना 29 आमदारांचा पाठिंबा; यादी आली समोर

राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमात 53 आमदारांपैकी 29 आमदारांनी उपस्थिती लावली आहे. अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, 29 च आमदार बैठकीला पोहोचल्याने अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या बैठकीत 'हे' आमदार आहेत उपस्थित

विधानसभा

 1. अजित पवार

 2. छगन भुजबळ

 3. हसन मुश्रीफ

 4. नरहरी झिरवळ

 5. दिलीप मोहिते

 6. अनिल पाटील

 7. माणिकराव कोकाटे

 8. दिलीप वळसे पाटील

 9. अदिती तटकरे

 10. राजेश पाटील

 11. धनंजय मुंडे

 12. धर्मराव अत्राम

 13. अण्णा बनसोड

 14. निलेश लंके

 15. इंद्रनील नाईक

 16. सुनील शेळके

 17. दत्तात्रय भरणे

 18. संजय बनसोड

 19. संग्राम जगताप

 20. दिलीप बनकर

 21. सुनील टिंगरे

 22. सुनील शेळके

 23. बाळासाहेब आजबे

 24. दीपक चव्हाण

 25. यशवंत माने

 26. नितीन पवार

 27. शेखर निकम

 28. संजय शिंदे

 29. राजू कोरमारे

विधानपरिषद

 1. अमोल मिटकरी

 2. रामराजे निंबाळकर

 3. अनिकेत तटकरे

 4. विक्रम काळे

दरम्यान, राष्ट्रवादीकडे एकूण 54 आमदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असेल तरच अजित पवार यांचे बंड यशस्वी होऊ शकते. परंतु, संख्याबळ नसेल तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल आणि त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com