आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये; अजित पवारांचा राऊतांना जोरदार टोला

आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये; अजित पवारांचा राऊतांना जोरदार टोला

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत.

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत. अशातच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही महाराष्ट्रात फोडफोडीची सिझन 2 सुरु असल्याचे म्हंटले होते. यामुळे अजित पवार राष्ट्रवादीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी अजित पवारांनी संजय राऊतांचे कान टोचले आहे.

आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये; अजित पवारांचा राऊतांना जोरदार टोला
भाजपसोबत जाणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, मी व सहकारी...

काही विघ्नसंतोषी माणसं बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. दुसऱ्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत. त्यांना कुणी अधिकार दिला आहे काय माहित, असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. पक्षाची मिटींग होईल त्यावेळी मी विचारेल. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षांबद्दल सांगा. तसेच, त्या पक्षाच्या मुखपत्राबद्दल बोला. आम्हाला कोट करुन असं झालं तसं झालं.

आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचे कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते मजबूत आहेत, असा टोला अजित पवारांनी संजय राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, कारण नसाताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. कोणत्याही 40 आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार आहोत. यामुळे बातम्यांना कोणातही आधार नाही, असे स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com