बिनखात्याचे मंत्री; खाते वाटपावरुन अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला

बिनखात्याचे मंत्री; खाते वाटपावरुन अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन अजित पवारांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.

मुंबई : खाते वाटप का रखडला अजून माहित नाही. कदाचित दिल्लीवरून ग्रीन सिग्नल नसावा. यामुळे आता मंत्री होऊन पण बिनखात्याचे आहेत, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन अजित पवारांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. पावसामुळे जमीन, पीक, रस्त्यांचे नुकसान झालं आहे. कायदा-सुव्यवस्थेवर आम्हाला चर्चा करायची आहे. कामकाज कमी दिवसाचे असल्यामुळे लक्षवेधीला वेळ दिला जाईल. सर्व प्रमुख गट नेत्यांची बैठक झाली. अबू आजमी आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आम्ही 16 ऑगस्टला फायनल स्ट्रेटजी ठरवणार आहोत. तसेच, आमचं सरकार गेल्या नंतर कुणाला काय वाटत याबद्दल चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेत राष्ट्रवादी विरोधीपक्ष नेते झाले. विधान परिषद नेता आम्हाला हवा होता. बसून निर्णय घेता आला असता, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत फुटीचे संकेत दिले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यांची संख्या जास्त असते. त्यांचा विरोधी पक्ष नेता होतो. आता आम्हाला वाद वाढवायचा नाही, असे उत्तर त्यांनी नाना पटोले यांना दिले आहे.

खाते वाटप का रखडला अजून माहित नाही. कदाचित दिल्लीवरून ग्रीन सिग्नल नसावा. यामुळे आता एका मंत्र्याकडे दोन पालक मंत्रीपद असेल, असे अंदाज अजित पवार यांनी वर्तविले. आता मंत्री होऊन पण बिनखात्याचे आहेत. आपण नकारात्मक विचार नको करू या सकारात्मक विचार करू या, असा खोचक टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

मी उपमुख्यमंत्री असताना पुण्याचा पालकमंत्री होतो. आता कदाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होतील अस दिसतंय. ते उपराजधानी नागपूरला सोडून पुण्याचे पालकमंत्री होत आहेत. पुण्याचा सुपुत्र म्हणून मी त्यांचे स्वागत करतो, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com