महायुतीत लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवार कोण?
महायुतीत लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सुचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत यावर चर्चा झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सध्या राष्ट्रवादीचा असलेल्या 4 जागांव्यतिरिक्त आणखी 5 जागांची महायुतीतील घटक पक्षांकडे अजित पवार गटाची मागणी असल्याचे समजते. बारामती, सातारा, रायगड, शिरूर व्यतिरिक्त धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगरचा जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याती माहिती मिळत आहे.
संभाव्य उमेदवारांची नावे लोकशाहीच्या हाती
१) बारामती - सुनेत्रा पवार
२) सातारा - रामराजे नाईक निंबाळकर
३) रायगड - सुनिल तटकरे
४) शिरूर - सध्या शिंदे गटात असणारे या मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील...
५) दक्षिण मुंबई - काँग्रेस मधील बडा चेहरा
६) परभणी- राजेश विटेकर
७) भंडारा गोंदिया - प्रफुल्ल पटेल
८) धाराशिव - राणा जगजितसिंह (सध्याचे भाजप आमदार)
९) छत्रपती संभाजीनगर - सतीश चव्हाण