अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष? 'त्या' निमंत्रण पत्रिकेमुळे चर्चांना उधाण

अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष? 'त्या' निमंत्रण पत्रिकेमुळे चर्चांना उधाण

अजित पवार गटाची आज पहिली जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

बीड : अजित पवार गटाची आज पहिली जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स बीडकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर, यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर अजित पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत सरकारमध्ये सामील झाले होते. परंतु, शरद पवार हेच आमचे नेते राहतील, असे सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सांगण्यात येते. परंतु, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड येथे अजित पवारांची सभा होणार असून यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर अजित पवारांचा उल्लेख राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर आता शरद पवार गटाची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधान सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवार यांनी करत राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, शरद पवारांनी घुमजाव करत हे मी बोललो नसल्याचे म्हंटले आहे. तर, सुप्रिया सुळेंनी मात्र विधानावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com