राजकारण
Kalwa Hospital Death : 'ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये एवढे मृत्यू कसे?' मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांचा सवाल
तुमच्या ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एवढे मृत्यू कसे काय घडले? असं विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चांगलीच अडचण केली.
तुमच्या ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एवढे मृत्यू कसे काय घडले? असं विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चांगलीच अडचण केली. शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अजितदादांनी हा प्रश्न विचारला, त्यातून मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय ही घटना गंभीर आहे, काळजी घेतली पाहिजे असेही पवारांनी सुनावले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी मध्यस्थी केली.