शिवसेना आमचीच बोलणारे या जाहिरातीत...; अजित पवारांचे टीकास्त्र, शिंदेंना दिले खुले आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर शरसंधान साधले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर शरसंधान साधले आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या जाहिरातीने त्यांनी स्वतःचे हास्य करून घेतले आहे. जनतेच्या मैदानात या, जनता कोणाच्या किती पाठीशी आहे हे समोर येईल, असे खुले आव्हानच अजित पवारांनी दिले आहे.

यांनी पक्ष का स्वताःकडे कडे खेचून घेतला तर बाळासाहेबांच्या विचारावर, आनंद दिघे यांच्या विचारांवर चालण्यासाठी. जाहिरात कशाकरिता केली जाते तर आपण केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी. परंतु, या जाहिरातीमध्ये सर्व्हे केला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. शिवसेना आमचीच बोलणारे या जाहिरातीत मोदी साहेबांचा फोटो टाकला आहे. पण, यात बाळासाहेबांचा फोटो वगळलेला आहे, अशी टीका त्यांनी अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

नेहमी काही झालं की बावनकुळे खुलासे करत असतात. आता सुध्दा या बाबतीत त्यांनी खुलासा करावा आणि हे भाजपला मान्य आहे का याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांनी पक्षाच्या वतीने ही जाहिरात केली आहे. या जाहिरातीने त्यांनी स्वतःचे हास्य करून घेतले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. जनतेच्या मैदानात या, जनता कोणाच्या किती पाठीशी आहे हे समोर येईल, असे आव्हानही अजित पवारांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com