आमच्याकडून चूक झाली तर चुकीचं दाखवा, मात्र...; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

आमच्याकडून चूक झाली तर चुकीचं दाखवा, मात्र...; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

कन्नड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर : आमच्याकडून चूक झाली तर चुकीचं दाखवा, मात्र आमची सत्य परिस्थिती दाखवा, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कन्नड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. तसेच, आजच्या कार्यक्रमास लोकांना जबरदस्तीने आणले नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावल आहे.

आजच्या कार्यक्रमास लोकांना जबरदस्तीने आणले नाही. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला लोक आली आहेत. काही जण नंतर व्हिडीओ व्हायरल करतात. परंतु, जे खरं आहे, ते दाखवा. आमच्याकडून चूक झाली तर चुकीचं दाखवा, मात्र आमची सत्य परिस्थिती दाखवा, असे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

इतर देशातील प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांच्या समोर नतमस्तक झाल्याने आपला सन्मान वाढतोय. जगातील सर्वात एक नंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ही अभिमानाची बाब आहे. नरेंद्र मोदी यांना घाबरून केजरीवाल येऊन भेट घेत आहेत. परंतु, लोक माझ्याकडे आले तरी काही जण त्यांच्या चहाचा हिशोब काढतात. किती आले, किती गेले, किती आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com