राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल : उध्दव ठाकरे

राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल : उध्दव ठाकरे

अरविंद केजरीवाल यांनी आज उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी आज उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना निवडणुकाबाबत भीती व्यक्त केली आहे. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल : उध्दव ठाकरे
...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात साप सोडू; संभाजीनगरच्या पँथर्स आर्मीचा इशारा

अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ राजकारण करतात. पण आम्ही नातं जपतो. लोकशाहीला कायम ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

आजपासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण केंद्राने अध्यादेश आणला. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त केंद्रात निवडणुका होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, आज केजरीवाल आले आहेत. आता जेव्हा केजरीवाल मुंबईत येतात तेव्हा ते मातोश्रीवर येतात. एक नवीन नातं निर्माण झाले आहे. आम्हाला काय करायचं आहे, पुढे कसं करायचं आहे याची चर्चा झाली. विरोधकांच्या एकजुटीसाठी अरविंद केजरीवाल यांचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com