केवळ मविआ नाही तर...; अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

केवळ मविआ नाही तर...; अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे.

मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे. यानुसार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीबाबत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती सांगितली आहे.

केवळ मविआ नाही तर...; अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला
बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला

कर्नाटकचा निकाल शनिवारी लागला. यानंतर शरद पवार यांनी सर्वांना बैठकीला बोलावलं होते. यामध्ये 2014 सालापासून काही राज्यांचा अपवाद वगळता मोदी यांचं सरकार आलं होते. यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह पाहायला मिळायचा. परंतु, कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल आला आणि सर्वच एक्झिट पोल पण फेल ठरलं. यामुळे मविआचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. यानंतर पुढची प्लॅनिंग कशी असली पाहिजे याबाबत वज्रमुठ सभेबद्दल बोलणी झाली, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून 48 जागांचं वाटप कसे असावे अशी चर्चा झाली. एकदम निवडणुका लागल्यावर घाई नको म्हणून चर्चा करण्यात आली. जागा वाटप झाल्यावर काही नाव तीनही पक्ष देतील. यानुसार सहा नेते बसून जागा वाटप कशाप्रकारे करायचं यावर चर्चा करू. केवळ मविआ नाही तर जे आमचे समर्थक पक्ष आहेत त्यांचाही समावेश आम्ही करून घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.

ठाकरे गटाने आज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत आमदार अपात्रतेबाबत पत्र दिले. यावर बोलताना अजित पवार यांनी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत. म्हणून शिवसेनेने झिरवळ यांच्याकडे पत्र दिलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातली ती गोष्ट आहे.

दरम्यान, अकोला शहरात घडलेल्या घटनेवरही अजित पवारांनी भाष्य केले. अलीकडे सायबर गुन्हे वाढलेले आहेत. कोणी क्लिप व्हायरल केली या सगळ्यांच्या खोलात तातडीने गेलं पाहिजे. काही शहरांमध्ये वातावरण तंग आहे हे ऐकायला मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित ठेवायचं काम राज्य सरकारचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com