भरसभेत आली चिठ्ठी; अजित पवार म्हणाले, आता भटके कुत्र्यांची नसबंदी...

भरसभेत आली चिठ्ठी; अजित पवार म्हणाले, आता भटके कुत्र्यांची नसबंदी...

विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.

विकास कोकरे | बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. अशातच, त्यांनी बारामतीत केलंलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. अजित पवार यांना सभा सुरु असताना एक चिठ्ठी आली. यामध्ये भटक्या कुत्र्यांसदर्भात तक्रार करण्यात आली होती. यावर अजित पवारांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.

भरसभेत आली चिठ्ठी; अजित पवार म्हणाले, आता भटके कुत्र्यांची नसबंदी...
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल; जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार म्हणाले...

बारामतीतील मोकाट कुत्री आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा, अशा आशयाची चिठ्ठी अजित पवारांना भरसभेत आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आता काय करतो, शरद पवार साहेबांना सांगतो तुम्ही जनावरांकडे बघता का कुत्र्यांकडे बघता? साहेब म्हणाले, अजित जनावरांचे बघतो तर मी कुत्र्यांकडे बघतो आणि सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. अरे काय चेष्टा! मी याचा एका झटक्यात बंदोबस्त करीन. आता लाड बास झाले. बारामतीत कोंडवाडा तयार करू आणि त्या जनावरांच्या मालकांना पाच-दहा हजार दंड करू आणि कुत्र्यांची नसबंदी करू, असे अजित पवारांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

दरम्यान, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आपले काम असून पुणे-मुंबई हायवेवर 100 स्पीडच्या पुढे गाडी गेल्यानंतर दंड भरावाच लागतो. त्या पद्धतीने पुढेदेखील अशा पद्धतीची नियमावली सर्वत्र करण्यात विचाराधीन आहे. एक आमदार मला म्हणाला की माझा निम्मा पगार तर फक्त दंडावरच जातो. मात्र, आमदार असो व आमदाराचा बाप असो सर्वांना नियम सारखाच, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com