...यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण; अजित पवारांनी सुनावले

...यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण; अजित पवारांनी सुनावले

मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुनावले आहेत.

कर्जत : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुनावले आहेत. महाराष्ट्रात समजा समाजामध्ये चिथावणी करणारी भाषण दोन्ही बाजूने होत आहेत हे थांबलं थांबायला हवं यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण, असा सवाल अजित पवारांनी केला आहे. ते कर्जमध्ये बोलत होते. तसेच, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

...यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण; अजित पवारांनी सुनावले
बंगळूरूमधील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही परिस्थितीत तडजोड करणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत गेलो चालले. ज्या जॉर्ज फर्नांडिस यांना भाजपची अॅलर्जी नव्हती तर तुम्हा-आम्हाला काय अडचण आहे? देशाचा विकासासाठी खमक नेतृत्व लागतं ते नेतृत्व मोदी साहेबांकडे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, प्रत्येकाला जातीचा धर्माचा अभिमान असतो. मात्र पहिले आपला देश, आपला भारत त्यानंतर सर्व गोष्टी. आपल्या जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्या जातीचा धर्माबाबत आकस बाळगण्याची गरज नाही त्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एखाद्या जातीला आरक्षण देताना त्या समाजाबाबत मागासलेपणा हे सिद्ध होण्याची गरज आहे हे मराठा समाजाने लक्षात घ्यावे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. सध्या जाती-जातीत जे भेदभाव सुरू आहेत ते चित्र दुर्दैवी आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा असं म्हटलं जातं त्यामुळे मराठा हे महाराष्ट्र आहे त्यामुळे सर्व जाती या मराठ्यांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्रात समजा-समाजमध्ये चिथावणी करणारी भाषण दोन्ही बाजूने होत आहेत हे थांबलं पाहिजे, थांबायला हवं. यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण, मात्र अस कधी अजित पवार हे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्यात यावी आणि जातीनिहाय जनगणना व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. अजित पवार जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत दंगली होऊन रक्त सांडू देणार. आता आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही यासाठी मुख्यमंत्री, मी आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतो आहे, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com