बंगळूरूमधील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बंगळूरूमधील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेल आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असता तात्काळ शाळांची झडती घेण्यात आली.

बंगळूरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेल आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असता तात्काळ शाळांची झडती घेण्यात आली.

बंगळूरूमधील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Ajit Pawar: महायुतीतल्या 'या' जागा अजित पवार गट लढवणार

बेंगळुरूमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यापैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे. ज्या शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या त्या सर्व शाळांमध्ये बॉम्ब निकामी पथके पाठवण्यात आली आहेत. ज्या शाळांना ही धमकी मिळाली आहे त्यात व्हाईटफिल्ड, कोरमंगला, बसवेशनगर, यालहंका आणि सदाशिवनगर येथील शाळांचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पोलीस तपास करतील आणि मी त्यांना तसे करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शाळांची तपासणी करून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत. पोलिस विभागाकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com