Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्व आमदार महायुतीत सहभागी होणार होते

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्व आमदार महायुतीत सहभागी होणार होते

राष्ट्रवादीचे सर्व आमदार महायुतीत सहभागी होणार होते असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे सर्व आमदार महायुतीत सहभागी होणार होते असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. "महायुतीत सहभागी होताना राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सगळ्यांचेच पत्र होते.

मला पुन्हा कोणाला अडचणीत आणायचे नाही पण सगळ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला होता. असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये बोलताना केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सर्वांनीच सत्ताधारी पक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता. आज विरोधात जे काही आमदार आहेत, त्यांनीही पाठिंबा देण्याचे ठरविलेले होते. पण अचानकच काही घडामोडी झाल्या आणि काहीजण विरोधात गेले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com