पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र होणार का? अजित पवारांनी स्वतःच सांगितले

पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र होणार का? अजित पवारांनी स्वतःच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यावर्षी पवार कुटुंबियांची दिवाळी पाडवा बारामती येथे एकत्र होणार का यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.

अमोल धर्माधिकारी | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यावर्षी पवार कुटुंबियांची दिवाळी पाडवा बारामती येथे एकत्र होणार का यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. यावर अजित पवार यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते डॉक्टरांच्या सल्ल्याने कुणालाही भेटणार नाही, असे सांगितले आहे.

पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र होणार का? अजित पवारांनी स्वतःच सांगितले
गुप्तहेर खात्याला बीड हल्याचा सुगावा का लागला नाही? पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या खात्यावर व्यक्त केली नाराजी

अजित पवारांनी ट्विटरवरुन यासंबंधीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सूचनेनुसार आपल्याला भेटता येणार नाही. मात्र, माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, कुटुंबियांना, नातेवाईक, मित्रपरिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com