Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

पार्थ पवार व शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पार्थ पवार यांनी आज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यावर अखेर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील स्वर्गीय आरआर पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar
LIVE : ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकीलांमध्ये निवडणूक आयोगासमोर जोरदार वाद

पार्थ पवार आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भेटीबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, मला अनेक नेते येऊन भेटायचे, मी पण अनेक मंत्र्यांना जाऊन भेटलो. विकास कामाविषयी जर चर्चा होत असते. आमचे पक्ष आणि विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांबद्दल टीकात्मक भाषण करायचे. पण, एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपली ती संस्कृती आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी होता, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

दरम्यान, रोहित पवार आमदार झाले. बारामती अ‍ॅग्रो त्यांच्याकडे आहे. आणि आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही रोहित पवार झाले आहे. अशात आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थ पवार यांची असेल. पार्थ पवार अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com