'राज्यभरात बॅनर लावत असाल तर शरद पवारांचा फोटो...; अजित पवारांचा आदेश
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बंडात अजित पवारांसोबत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार असे समजते की, सकाळी देवगिरी बंगल्यावरती शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पाठिंबा देणारे आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो नाही आहे. त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.
त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, राज्यभरात कुठेही पोस्टर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचा फोटो लावा. असे अजित पवार यांनी सांगितले आहे.