...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय; काय म्हणाले अजित पवार?

...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय; काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलचे उद्घाटन केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी मोदी-शहा यांचे कौतुक केले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात, असे शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलचे उद्घाटन केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय; काय म्हणाले अजित पवार?
तुम्हाला त्यावर पीएचडी करायचीयं का? राऊतांचा लोकसभा अध्यक्षांना खोचक सवाल

अजित पवार म्हणाले की, अमित शाह गुजरातचे असले तरी जास्त प्रेम महाराष्ट्रावर आहे कारण ते महाराष्ट्रचे जावई आहेत. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही 22 वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित भाईंनी दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.

अजित पवारांनी असं का केलं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात, असे अजित पवारांनी बंडाचे कारण सांगितले आहे. तसेच, शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीचं करू शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com