निरपेक्ष पद्धतीने शिवसेनेला न्याय मिळाला; अजित पवारांची प्रतिक्रिया

निरपेक्ष पद्धतीने शिवसेनेला न्याय मिळाला; अजित पवारांची प्रतिक्रिया

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; हायकोर्टाने दिली परवानगी

पुणे : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यावर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अखेर शिवसेनेला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष सुरु आहे. यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिवसेनेला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, शिवसेनेला न्याय मिळाला आहे. यावर मी मनापासून समाधान व्यक्त करतो. निरपेक्ष पद्धतीने हा न्याय मिळाला आहे. ज्यांना एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी बीकेसीला जावे व ज्यांना उध्दव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत. त्यांनी शिवाजी पार्कला जावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, अजित पवारांनी नकतेच गृहमंत्री पदाबाबत विधान केले होते. जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते. पण, वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही, असे अजित पवारांनी म्हंटले होते. यावर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, गृहमंत्री पद हवं गंमतीने बोललो. कार्यकर्ते म्हणत होते, लोक रेंगाळले म्हणून बोललो. मी सर्वचत जबाबदाऱ्या आवडीने पार पाडल्या आहेत, अशी सारवा-सारव अजित पवारांनी केली आहे.

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर अजित पवार म्हणाले, टार्गेट महापालिका नाही. जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम केलं. लोकांची कार्यकर्त्यांनी मदत केली. महापालिकाबाबत विचार करत बसू नका. तीन-चार प्रभाग झाला तरी लढायच आहे. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. एकत्रित लढण्यावेळी जे होईल ते होईल ते निर्णय उच्च स्तरावर नेते निर्णय घेतील. पण, आपण खालील स्तरावर कामे करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सगळयांना कळतय लोक पाहत आहेत. इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले सांगतात आम्हाला शांत झोप लागते. भाजपने खुशाल लढावं. आम्ही आमचे काम करू आणि दाखवू. त्यांनी त्याच काम दाखवावे, असे आव्हान अजित पवार यांनी भाजपला दिले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com