पक्ष चिन्हाचा फोटो का हटवला? अजित पवारांनी सांगितले नेमके कारण

पक्ष चिन्हाचा फोटो का हटवला? अजित पवारांनी सांगितले नेमके कारण

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

मुंबई : राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच अजित पवारांनी ट्विटर अकाउंटवरील कव्हरपेज डिलीट केले. यावरुन राष्ट्रवादीचा लोगो हटविल्याची चर्चा करण्यात येत होती. परंतु,अजित पवारांनी या चर्चा फेटाळल्या असून नेमके कारण सांगितले आहे.

पक्ष चिन्हाचा फोटो का हटवला? अजित पवारांनी सांगितले नेमके कारण
आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये; अजित पवारांचा राऊतांना जोरदार टोला

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री असताना त्यामधील काही दाखवलेलं होते. त्याच्यातील उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढलं आणि बाकीचं आहे तसेच आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच, ध चा मा केला जातोय. राष्ट्रवादी सोडणार असेल तर मीच सांगेल ज्योतिषाची गरज नाही. काही विघ्नसंतोषी माणसं बातम्या पेरण्याची काम करत आहेत. ती आमच्या पक्षातील नाही. माझ्याबद्दल पक्षात कोणालाही आकस नाही, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. कोणत्याही 40 आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार आहोत. यामुळे बातम्यांना कोणताही आधार नाही, असे स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com